सातारा येथे कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी !

सामाजिक अंतर राखण्याचा फज्जा !

  • आपत्काळात सर्वांना लस वेळेत आणि कोणतीही अडचण न येता मिळावी यासाठी प्रशासनाचे नियोजन नसल्याचा हा परिणाम ! आतातरी चांगले नियोजन करून सर्वांना व्यवस्थित लस मिळावी, हे पहायला हवे.
  • नागरिकांनी केवळ लस घेण्याची घाई न करता सामाजिक अंतर न पाळल्यास कोरोनाची लागण होऊ शकते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
प्रतीकात्मक चित्र

सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – राजवाडा येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्या कोरोना प्रतिबंधित लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिक लसीकरणासाठी सकाळी ६-७ वाजल्यापासून रांगेत उभे रहात आहेत. यामुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरही अपुरा पडत असून कुणीही सामाजिक अंतर पाळत नाही.

रुग्णालयातील कर्मचार्‍यांना नागरिकांना कसे समजावयाचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे ? त्यातच आता १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा ताण पोलीस, महसूल, आरोग्य विभाग यातील सर्वच कर्मचार्‍यांवर आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती यंत्रणा राबवायची, याचा विचार रुग्णालय प्रशासन करत आहे.