
कल्याण, २५ एप्रिल (वार्ता.) – डोंबिवली येथील कल्याण शीळ रस्त्याजवळ एस्.एस्.टी वैद्यरत्न हे कोविड रुग्णालय आहे. २३ एप्रिलच्या रात्री ९ वाजता कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती करून नेण्यासाठी घेऊन जातांना रुग्णालयाचे उदवाहन यंत्र (लिफ्ट) पहिल्या मजल्यावरून अचानक खाली कोसळले. यात रुग्णासह चौघेजण घायाळ झाले आहेत. कोरोनाग्रस्त मुलावर याच रुग्णालयात उपचार चालू आहेत, तर अन्य तिघांना उपचारासाठी डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले असून याविषयी देखभाल दुरुस्ती विभागाला कळवले आहे. ‘या रुग्णांवरील उपचाराचा संपूर्ण व्यय आमच्याकडून केला जाईल’, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !