कायद्याचा धाक नसलेले धर्मांध !
कोल्हापूर, २४ एप्रिल (वार्ता.) – कुंभार गल्ली येथे भाजी विक्री करणार्या हिंदु शेतकर्यांना २३ एप्रिल या दिवशी सकाळी ९.३० वाजता काही उद्दाम धर्मांधांनी भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. या धर्मांधांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन या शेतकर्यांना त्यांच्या पाटीतील भाजी विकू न देणे, शेतकर्यांच्या अंगावर धाऊन जाणे, असे प्रकार केले. यातील काही शेतकरी हे २०-३० किलोमीटर अंतरावरून मोठ्या कष्टाने ग्रामीण भागातून भाजी घेऊन आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच अडचणीची स्थिती असतांना या हिंदु भाजीविक्रेत्यांना मनाई केल्याने या विक्रेत्यांची सहस्रो रुपयांची हानी झाली. शेतकर्यांशी बोलतांना ‘महापालिका आमचे काही वाकडे करू शकत नाही. तुमची भाजी पंचगंगेच्या नदीत फेकून द्या’, अशी उद्दाम उत्तरे या धर्मांधांनी शेतकर्यांना दिली. (सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्याने धर्मांध आज हिंदु शेतकर्यांना भाजी विक्री करण्यास मनाई करत आहेत. अशा घटना उद्या देशभर घडल्यास आश्चर्य वाटायला नका ! शेतीमालावरून नेहमीच गळा काढणार्या शेतकरी संघटना हिंदु शेतकर्यांवर झालेल्या अन्यायावर आवाज उठवणार का ? – संपादक)