विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पिकांच्या हानीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४३.५ अंशापर्यंत नोंदवले गेले आहे. अकोला जिल्ह्यात तापमान ४२.५ अंश आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिक उकाड्याने त्रस्त्र आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेला पर्याय नाही !

त्यामुळे शेतकरी वर्गाचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या सर्वांतून पुढे जातांना यशसिद्धीचा मार्ग काढायचा असेल, तर या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलेच पाहिजे.

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

असे सर्वानन् सर्वत्र हवेत !

जनतेला वस्तूनिष्ठपणे विचार करायला लावून त्यांना कृती करायला लावणारे राजकारणी विरळ आहेत. समाजाची आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राची स्थिती जाणून त्याच्या उत्कर्षासाठी कष्ट उपसण्याची सिद्धता बहुतांश लोकांची नसते.

नागपूर येथे फार्मसीतून ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन विक्रीला बंदी ! – जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा अनियंत्रित वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील फार्मसीतून ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश ७ एप्रिल या दिवशी दिला.

कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘जम्बो कोविड सेंटर’ उभारा !

आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

वाझे प्रकरणात माझा काडीचाही संबंध नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का ?, याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

दळणवळण बंदीतील घटस्फोट !

जगभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या वर्षी काही मास दळणवळण बंदी होती. याचे परिणाम वेगवेगळ्या स्तरांवर झालेले दिसत आहेत. यामध्ये कौटुंबिक कलह आणि त्यातून घटस्फोट होणे, ही गंभीर समस्याही समोर आली आहे.

महाराष्ट्रातील घटनांमुळे सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

“राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या.”

जे घडत आहे, ते राज्य आणि पोलीस यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला अन्वेषण करायला सांगितले असून यामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील, त्यांचे संबंधित यंत्रणेने अन्वेषण करावे. यातून सत्य बाहेर आले पाहिजे. अन्यथा डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही.