जे घडत आहे, ते राज्य आणि पोलीस यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नागपूर – सचिन वाझे यांनी लिहिलेले पत्र गंभीर असून त्यात लिहिलेल्या गोष्टी सर्वांना विचार करायला लावणार्‍या आहेत. महाराष्ट्रात जे घडत आहे, ते राज्य आणि पोलीस यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला अन्वेषण करायला सांगितले असून यामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील, त्यांचे संबंधित यंत्रणेने अन्वेषण करावे. यातून सत्य बाहेर आले पाहिजे. अन्यथा डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही.’’