केरळमध्ये लव्ह जिहाद असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे विधान काँग्रेसच्या नेत्याने मागे घेतले !

साम्यवादी पक्षाच्या दबावाचा परिणाम !

साम्यवादी पक्षाचे नेते लव्ह जिहादच्या चौकशीला इतके का घाबरतात, हे जगजाहीर आहे. त्यांचा लव्ह जिहाद करणार्‍यांना छुपा पाठिंबा असल्याने ते अशा प्रकारची कोणतीही चौकशी होऊ देणार नाहीत, हे लक्षात घ्या ! 

काँग्रेसचे नेते जोस के. मणी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये विधानसभेची निवडणूक चालू असून येत्या ६ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यातील एल्.डी.एफ्. आघाडीमधील घटक पक्ष असणार्‍या काँग्रेसचे नेते जोस के. मणी यांनी ‘जर केरळमध्ये लव्ह जिहादवरून चिंतेचे वातावरण असेल, तर याची चौकशी केली पाहिजे’, असे विधान केल होते; मात्र साम्यवादी पक्षाच्या नेत्यांच्या दाबावामुळे मणी यांना त्यांचे विधान मागे घ्यावे लागले.

१. मणी यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी म्हटले होते की, लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले, तर त्याची चौकशी केली पाहिजे. निदान तसे केले पाहिजे. तरीही लोकांना त्यावर संशय आहे, तर त्याचा खोलवर अभ्यास केला पाहिजे.

२. यानंतर साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले की, हे मणी यांचे वैयक्तिक मत आहे. आमच्या घोषणापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, लव्ह जिहाद हा शब्द धर्मांध शक्तींनी निर्माण केला आहे.

३. भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् म्हणाले की, मणी यांच्या विधानाने सिद्ध झाले की, भाजप जे सूत्र उपस्थित करत आहे, तेच राज्यातील प्रचाराचे मुख्य सूत्र आहे. जर राज्यात भाजपचे सरकार आले, तर आम्ही लव्ह जिहादविरोधी कायदा बनवणार आहोत. ‘आम्ही हे जनतेला आश्‍वासन दिले आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

ख्रिस्ती समाजाकडून मणी यांच्या विधानाचे स्वागत!

मणी यांच्या विधानाचे केरळ कॅथोलिक बिशप्स कौन्सिलने समर्थन केले आहे. त्याने म्हटले की, केरळमध्ये लव्ह जिहाद ही एक वस्तूस्थिती आहे. मणी यांच्या विधानावर आम्ही खुश आहोत. राज्यातील अन्य पक्षांनीही यावर मत व्यक्त केले पाहिजे.