वर्धा येथील साधकांना रामनाथी आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात पाय ठेवताक्षणी थंड वारे मला स्पर्श करत होते. आश्रमात प्रवेश केल्यावर मला शांतता आणि चैतन्य जाणवत होते. येथे आल्यावर मला साक्षात् स्वर्गसुखाची अनुभूती आली.

रामनाथी आश्रमात येतांना प्रवासात कुलदेवी श्री भवानीदेवीचा नामजप होणे आणि आश्रमात प्रवेश करतांना ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप आपोआप चालू होणे

आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून चारचाकीने आत प्रवेश करतांना ‘माझा कुलदेवीचा नामजप बंद होऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू झाला’. त्या वेळी ‘मी एखाद्या भगवान शिवाच्या तीर्थक्षेत्री आहे’, असे मला वाटत होते.