एप्रिल ते जून या मासांमध्ये भारतातील काही भागांत भीषण उन्हाळा असणार ! – हवामान खात्याचा अंदाज

नवी देहली – भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ मासांमध्ये उत्तर भारत, उत्तर-पश्‍चिम भारत आणि मध्य भारतातील काही ठिकाणी भीषण उन्हाळा असणार आहे. या उलट दक्षिण भारतातील काही भाग, पूर्व भारतातील काही भाग, तसेच पूर्वोत्तर भागातील तापमान सामान्यपेक्षा अल्प असणार आहे. उत्तर भारतात सध्या उष्माघाताची स्थिती निर्माण झाली आहे.

देहलीमध्ये ७६ वर्षांनंतर सर्वाधिक तापमान

भारताची राजधानी देहलीमध्ये ४०.१ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे. वर्ष १९४५ मध्ये अशा प्रकारच्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. (वर्ष १९४५ नंतर २ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला, आता पुढील २ वर्षांनी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, असा विचार यातून कुणी करत असेल, तर तो चुकीचा कसा ठरेल ? – संपादक)