पुलवामा येथे ४ आतंकवादी ठार

भाजप नेत्याच्या घरावर बुरखा घालून आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचाही समावेश

भारतात जिहादी आतंकवादी त्यांच्या कारवाया करण्यासाठी बुरख्याचा वापर करतात, हे लक्षात घेऊन भारतात किंवा प्रथम काश्मीरमध्ये तरी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील पुलवामा येथील चकमकीमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या चकमकीच्या वेळी स्थानिक लोकांनी सुरक्षादलांना विरोध केला. त्यांच्यावर कारवाई केल्यावर २ जण घायाळ झाले. या चकमकीत श्रीनगरमध्ये भाजपच्या नेत्याच्या घरावर बुरखा घालून आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचाही समावेश आहे. या आक्रमणात १ पोलीस कर्मचारी हुतात्मा झाला होता. बुरखा घालून आलेल्या आतंकवाद्याने महिलेच्या आवाजात नेत्याला भेटण्यासाठी आल्याचे घराबाहेर असलेल्या पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याला महिला समजून पोलिसांनी घराचे दार उघडले. त्यानंतर त्याच्या मागे उभ्या असणार्‍या आतंकवाद्याने पोलिसांकडील रायफल काढून घेतली आणि गोळीबार केला. यात रमीज राजा हे पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले.