
पुणे – येथील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. या मार्केटमध्ये मटण आणि चिकन यांची दुकाने आहेत. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यानंतर १ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही; पण दुकानात असणार्या कोंबड्या आणि बकर्या यांचा मात्र जळून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी आल्या होत्या; मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !