वस्तीवरील जनावरांसह नागरिकांचेही आरोग्य धोक्यात

सातारा, १७ मार्च (वार्ता.) – पांडे-खानापूर सीमेलगत दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची शेतभूमी आहे. त्यांच्या शेजारी संतोष घाटे यांची शेतभूमी आहे. घाटे यांनी शेतात १० ते १२ ट्रॅक्टर मळी टाकली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून तेथे पुष्कळ प्रमाणात माशा घोंघावत आहेत. त्यामुळे जनावरांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मळीतील घातक रसायनामुळे पिण्याच्या पाण्याची विहीर दूषित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. याविषयी भुईंज पोलीस ठाणे आणि सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती तक्रारदार दिलीप चव्हाण यांनी दिली.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण