प्रजासत्ताकदिनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या ४ धर्मांध तरुणांना अटक

अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

२ वर्षांत राज्यातील २३ मराठी प्राथमिक शाळा बंद

राज्यात मागील २ वर्षांत २३ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना दिली. विधानसभेत उपस्थित प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांना कारागृहात डांबा !

सांताक्रूझ-ताळगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांताक्रूझ आणि ताळगांव ग्रामस्थांची पाऊसकर यांच्या घरासमोर निदर्शने

अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे निदर्शने केली.

सांगे येथेही आयआयटी प्रकल्प उभारण्यास विरोध

मेळावली, सत्तरीनंतर आता सांगे येथे आयआयटी प्रकल्पास विरोध होत आहे. सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशासकीय संस्था आणि कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक झाली.

३० जानेवारी या दिवशी देहलीत भाजपकडून तिरंगा मोर्चा

येथे प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांनी केलेल्या हिंसाचारानंतर आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ३० जानेवारी या दिवशी देहलीमध्ये तिरंगा फडकावणारा मोर्चा आयोजित केला आहे.

शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराचा भारतमाता की जय संघटनेकडून निषेध !

राष्ट्रीय मानचिन्हांवर आक्रमणे करणार्‍यांची गय न करता, या हिंसाचारास उत्तरदायी असणार्‍यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी.

यापेक्षा समान नागरी कायदा करा !

जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही, तोपर्यंत आपण हम दो हमारे पांचचा संकल्प केला पाहिजे, असे विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती

मनुष्यावर गुरुकृपा झाली, तर त्याचे जीवन धन्य होते. देवाचा नामजप केल्याने भवसागरातून जीवननौका पार होते.