२ वर्षांत राज्यातील २३ मराठी प्राथमिक शाळा बंद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) – राज्यात मागील २ वर्षांत २३ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना दिली. विधानसभेत उपस्थित प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

ते पुढे म्हणाले, वर्ष २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १२, तर वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ११ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ७४२ सरकारी प्राथमिक शाळा आहेत आणि यामध्ये एकूण २० सहस्र ६०१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तसेच ७४२ पैकी २४ सरकारी प्राथमिक शाळांकडे स्वत:ची इमारत नाही.