सांगे, २७ जानेवारी (वार्ता.) – मेळावली, सत्तरीनंतर आता सांगे येथे आयआयटी प्रकल्पास विरोध होत आहे. सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशासकीय संस्था आणि कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक झाली.
या बैठकीत प्रकल्प विरोधक म्हणाले, सांगे येथे आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी पूर्वी भूमी निश्चित करण्यात आली होती. ही भूमी आदिवासी लोकांची आहे आणि तिच्यावर शासनाचा अधिकार नाही. ही भूमी शासनाने पुन्हा शेतकरी आणि आदिवासी लोकांना सुपुर्द करावी. मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प शासनाने नुकताच रहित करून राज्यात आयआयटी प्रकल्पासाठी भूमी निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली आहे.