राष्ट्रगीत म्हणून ‘वन्दे मातरम्’ नाकारण्यामध्ये अल्पसंख्यांकांचा विरोध, हेच कारण !
भारतीय राज्यघटना सिद्ध करतांनाच राष्ट्रगीत कोणते असावे, यासंबंधी घटना समितीमध्ये तपशीलवार चर्चा झाली. ‘वन्दे मातरम्’ हे गीत प्रामुख्याने सर्वांच्या समोर चर्चेसाठी आले. या गीताने लाखो जणांना देशभक्ती स्फुरली.