उंबर्डे हायस्कूलच्या मुख्याध्यापकांसह २४ जणांवर कारवाईचे आदेश
स्वत:च्या मुलाला उत्तीर्ण करण्यासाठी मुख्याध्यापकांनी रचले कुभांड

सिंधुदुर्ग – वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षाकेंद्रावरील इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे सूत्रधार हे उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय राठोड हेच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासह आणखी २३ जणांवर कारवाई करण्याचे आदेश कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. एकूण २४ जणांपैकी संजय राठोड, पर्यवेक्षक संजय कुमार आडे आणि अन्य एक व्यक्ती अशा ३ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ केंद्रावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात स्वत:च्याच मुलाला इयत्ता १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक संजय राठोड यांच्याकडून परीक्षाकेंद्रावरील यंत्रणेचाच गैरवापर करण्यात आला. या प्रकरणी कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. असे असले, तरी लालसेपोटी पालकाने घडवून आणलेला हा गैरप्रकार तब्बल २४ जणांच्या भविष्याला ग्रहण लावणारा ठरला आहे.
चौकशीअंती एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे या केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार घडलेला नाही; मात्र एकाच विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या ५ विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार करण्यासाठी केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक आदी सर्वांनाच या गैरप्रकारात ओढण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक हानी तर झालीच आहे; पण सोबतच इतर शिक्षकही अडचणीत सापडले आहेत.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे