
पणजी, २१ जून (वार्ता.) – योग हा केवळ कार्यक्रमापुरता नसून प्रत्येकाचे आरोग्य आणि संतुलित जीवन यांसाठी आहे. प्रत्येक घरात योग, प्रत्येक शाळेत योग, प्रत्येक कामाच्या ठिकाणी योग असे होऊन योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये जागतिक योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि इतरांनी योगासने केली. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रसारित केले गेले. २१ जून या दिवशी गोव्यात १५० हून अधिक ठिकाणी योगदिनाचे कार्यक्रम झाले.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !