राष्ट्रगीत म्हणून ‘वन्दे मातरम्’ नाकारण्यामध्ये अल्पसंख्यांकांचा विरोध, हेच कारण !

भारतीय राज्यघटना सिद्ध करतांनाच राष्ट्रगीत कोणते असावे, यासंबंधी घटना समितीमध्ये तपशीलवार चर्चा झाली. ‘वन्दे मातरम्’ हे गीत प्रामुख्याने सर्वांच्या समोर चर्चेसाठी आले. या गीताने लाखो जणांना देशभक्ती स्फुरली. ‘ज्या गीतामुळे शेकडो देशभक्त हसत हसत फासावर गेले, ज्या गीताने सर्व भारतियांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले, ते गीत राष्ट्रगीत झाले पाहिजे’, असा बहुतेकांचा आग्रह होता. काही मूठभर विद्वानांनी हे राष्ट्रगीत करण्याला विरोध दर्शवला. त्या गीतात ‘मातृभूमीची पूजा कल्पिलेली आहे’, हा विरोधाचा मुद्दा होता. ‘मूर्तीपूजा मान्य नाही, म्हणून ‘वन्दे मातरम्’ नाकारण्यात यावे’, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रगीत होऊ शकले नाही. इंग्रज राणीचे स्वागत करण्याकरता रचलेले ‘जन गण मन’ राष्ट्रगीत म्हणून मान्य करण्यात आले. हा केवढा प्रचंड दैवदुर्विलास आहे. ‘वन्दे मातरम्’ नाकारण्यामध्ये अल्पसंख्यांकांचा विरोध, हेच कारण होते.

– अधिवक्ता दादासाहेब बेंद्रेे, पुणे (संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)