
मुंबई – ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर’च्या वर्ष २०२६-२८ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ने मोठा विजय मिळवला. १ ते १३ जून या कालावधीत राज्यभर मतदान झाले आणि १५ जून या दिवशी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत एकता पॅनेलच्या रोड रोलर आणि प्रगती पॅनेलचे विमान यांच्यात थेट लढत झाली. अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष रविंद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी यांनी संगीता पाटील यांचा २ सहस्र ३८५ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्रात सुनिता फाल्गुने आणि कोकणात संतोष राणे विजयी झाले.
शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर’च्या सभासदांनी पुन्हा एकदा स्थैर्य आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून नव्या नेतृत्वाकडून उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उत्तर महाराष्ट्रात महेंद्र अगरवाल, मुंबई विभाग-१ मधून डॉ. धनश्री हरदास, मुंबई विभाग-२ मधून किरण भोसले, पश्चिम महाराष्ट्रातील सरजेराव नलावडे व संजय शेटे, मराठवाड्यातून संजय किर्दक आणि विदर्भातून सिद्धार्थ रुहाटिया बिनविरोध निवडले गेले. चेंबरच्या ९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विदर्भातून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. एकूण १४९ गव्हर्निंग कौन्सिल सदस्य निवडले गेले. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडली.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा