७ लाख २० सहस्र रुपयांचा अमली पदार्थ जप्त

विरार – नवी मुंबई अमली पदार्थ विभागाने मोठी कारवाई करत नालासोपारा पश्चिम येथील समेलपाडा परिसरात दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कह्यातून ७ लाख २० सहस्र रुपयांचा एम्.डी. हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. महंमद अली शफी भाटी (वय ४२ वर्षे) आणि महंमद रफिक युसूफ शेख (वय ३९ वर्षे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या कह्यातून ७ लाख २० सहस्र रुपयांचे एम्.डी. जप्त केले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक काँग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता आहे. प्रशासकीय स्तरावरही त्याची बरीच ओळख होती. त्याचा अपलाभ घेत तो अमली पदार्थाचा व्यवसाय करत होता.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !