१५ दिवसांत ६ सहस्र कि.मी.चा प्रवास

पुणे – महाराष्ट्रातील देशी गोवंशियांचे रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ आणि ‘पशूसंवर्धन विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ आयोजन करण्यात आली आहे. ही यात्रा २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार असून यात्रेचा शुभारंभ २२ जून या दिवशी दुपारी ४.३० वाजता पशूसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष आणि यात्रा आयोजन समितीचे प्रमुख श्री. शेखर मुंदडा यांनी दिली. यात्रेचा समारोप नागपूर येथे होणार आहे. या व्यापक मोहिमेत राज्यातील सर्व गोपालक, शेतकरी, सामाजिक संस्था आणि गोप्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मुंदडा यांनी केले आहे.
सांगता समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशूसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत.

या वेळी श्री. मुंदडा म्हणाले, ‘‘संवाद यात्रा सलग १५ दिवस चालू रहाणार असून या कालावधीत अनुमाने ६ सहस्र किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे संचलन होणार असून यामध्ये राज्यातील १ सहस्राहून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात १५ सहस्रांपेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकरी थेट संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली जाईल.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !