शिक्षकासमवेतच जाण्याच्या युवतीच्या हट्टामुळे सर्वच अवाक्

सिंधुदुर्ग – तालुक्यातील एका माध्यमिक शाळेच्या ५५ वर्षीय शिक्षकाने गावातील युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी त्या शिक्षकाला चोप दिल्याचे समजते; मात्र पोलीस ठाण्यात प्रकरण गेल्यानंतर ‘मी त्या शिक्षकासोबतच जाणार’, असे युवतीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे युवती सज्ञान असल्याने पोलिसांनी जबाब लिहून घेत दोघांनाही सोडून दिले. युवतीच्या या निर्णयामुळे सर्व जण अवाक् झाले.
या घटनेनंतर २० जून या दिवशी पालक, ग्रामस्थ आणि संबंधित शाळा संस्थेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या वेळी पालकांनी आक्रमक भूमिका घेत त्या शिक्षकाचे स्थानांतर करण्याची मागणी लावून धरली. ‘अशा विकृत वृत्तीचे शिक्षक शाळेत नकोच. तो शिक्षक शाळेत आल्यास आमची मुले शाळेत पाठवणार नाही’, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर संस्था समन्वय समिती सचिवांनी ‘त्या शिक्षकाला सक्तीच्या सुट्टीवर पाठवत आहोत. तो शिक्षक पुन्हा शाळेत दिसणार नाही’, अशी ग्वाही दिल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ शांत झाले. त्या शिक्षकाची तात्काळ बदली करण्यात येईल, अशी ग्वाही समन्वय समितीच्या सचिवानी दिली.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे