पोर्शे कार अपघात प्रकरण

पुणे – कल्याणीनगर येथील पोर्शे कार प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने संमत केला आहे; मात्र त्यांचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज करणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केल्याने विशाल अग्रवाल आणि कुटुंबियांनी जल्लोष केल्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली होती. या घटनेची नोंद घेऊन अग्रवालचा जामीन रहित करावा यासाठी पुणे पोलिसांनी सिद्धता चालू केली आहे. यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाची अनुमतीही मिळाली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. ‘जामीन मिळाल्यानंतर केलेल्या जल्लोषाची चित्रफीत सामाजिक माध्यमांत प्रसारित करणे, हे मृतांच्या कुटुंबियांची भावना दुखावणारे आहे’, असे पोलिसांनी सांगितले.
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री