मंदिर परिसर ‘कॉरिडॉर’, चंद्रभागा घाट विकास, वारकरी सुविधा आणि पुनर्वसनासाठी मोठे प्रावधान

‘कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग)
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्यास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३ सहस्र ९९३ कोटी ९० लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर हा शासन निर्णय देण्यात आला आहे. या आराखड्यामुळे पंढरपूरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन आणि दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी २५४ कोटी ६१ लाख रुपयांचा मंदिर परिसर ‘कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे.
२. नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, प्रकाशयोजना, रस्ते आणि इतर सुविधा यांसाठी १६२ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
३. चंद्रभागा नदीकाठ आणि घाटांचे सुशोभीकरण, सुरक्षितता आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी ४४८ कोटी ३९ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.
४. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरी सुविधांच्या सुशोभीकरणासाठी ४८० कोटी ५० लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.
भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी सर्वाधिक निधीया महाआराखड्यात भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी १ सहस्र ७९२ कोटी ७२ लाख रुपये, तर बाधित इमारतींच्या मोबदल्यासाठी २३४ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. पुनर्वसन आणि मोबदला यांसाठी एकूण २ सहस्र २६ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. |
१. दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरात येतात. त्यांच्या निवास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, माहिती केंद्र, गर्दी व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधांसाठी २८८ कोटी ६६ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे, तसेच विकासकामांमुळे प्रभावित होणार्या नागरिकांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
२. पंढरपूर परिसरातील ऐतिहासिक मंदिरे, मठ आणि धार्मिक वारसा जतन करण्यासाठी ३६ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. विकासकामे करतांना ऐतिहासिक वास्तूंची मूळ रचना आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये कायम राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३. वाहनतळ आणि व्यापारी संकुल उभारण्यासाठी ६८ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
४. पंढरपूर शहराला जोडणारे रस्ते आणि पूल उभारण्यासाठी १२७ कोटी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
५. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी तळांच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.
खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !