
योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा ! – केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल
मुंबई – योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा असून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारे प्रभावी माध्यम आहे. योगामुळे निरोगी, सकारात्मक आणि शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असून प्रत्येकाने योगाचा समावेश दैनंदिन जीवनात करावा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केले. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मालाड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिहादी मानसिकतेच्या शिक्षण संस्थांची मान्यता रहित करा !
भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांची मागणी
मुंबई – खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाकिस्तानी गाण्यांवर आतंकवादी मानसिकतेचे नृत्य केले जाते. महाराष्ट्र शासनाने गंभीर कारवाई करून काही मुख्याध्यापकांवर गुन्हे नोंदवले आहेत; पण जिहादी मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये पसरवणे हा देशद्रोह आहे. सर्व संस्थांची मान्यता तातडीने रहित करून अल्पसंख्यांक म्हणून विशेष दर्जा प्राप्त असलेल्या शाळांचा अभ्यासक्रम पडताळून त्यांना मिळणार्या विशेष सवलती तातडीने रहित कराव्यात. तेथे राष्ट्रीय विचारांचे शिक्षण द्यायला हवे, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केली आहे.
आत्महत्येप्रकरणी अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
बोईसर – येथील नामांकित ‘विराज प्रोफाईल आस्थापना’चे कार्यकारी संचालक प्रदीप जाधव (वय ५७ वर्षे) यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून रहात्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.पी. गर्ग यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (छळवणूक करणार्या अशांना आस्थापनातून बडतर्फच करायला हवे ! संपादक)
वाहनाचा भीषण अपघात !
बदलापूर – येथील मुंबई-बडोदा महामार्गावर २५१ किमी/तास वेग असलेल्या बी.एम्.डब्ल्यू. चारचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. चारचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकाला धडकली. गाडी अनेकदा पलटी झाली. वाहनातील एका तरुणीच्या मृतदेहाचे अवयव ५०० मीटर दूरपर्यंत उडाले होते.
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !