पुणे – पुणे विभागातील धरणामध्ये उपयुक्त जलसाठा ७७ अब्ज घनफूट (टी.एम्.सी.) गतवर्षीच्या १६९ अब्ज घनफूट (टी.एम्.सी.) तुलनेत ९०.९ टी.एम्.सी. इतकी तूट आहे. विभागातील पर्जन्यमान विश्लेषण, धरणातील पाणीसाठा आणि पाण्याचा वापर यांविषयी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी १८ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्या वेळी जलसंपदा विभागाकडून धरणसाठ्यातील पाण्याच्या तुटीची माहिती देण्यात आली. बैठकीला अधीक्षक अभियंत्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण साखळी प्रकल्पात २९.१५ टी.एम्.सी. जिवंत पाणीसाठा असून ४.१३ टी.एम्.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. पवना धरणामध्ये १.६५ टी.एम्.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्टअखेर पुणे शहरासाठी ४ टी.एम्.सी. आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी १.५ टी.एम्.सी. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी दिली. धरणातील अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप आणि अन्य साधनांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या प्रावधानानुसार कठोर कारवाई करावी, असे सांगितले. पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायती, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणीवापराचा साप्ताहिक आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्ह्याला सादर करावा. जलसंपदा विभागाने जलाशय प्रचलन-संवर्धन धोरण राबवून आवश्यकतेनुसार उपाययोजना राबवाव्यात.
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !