मंदिरातील भक्तीगीतांचा आवाज अल्प करण्याची केली मागणी

तुमकुरू (कर्नाटक) येथील मुसलमान युवकांचा हिंदुद्वेष !

तुमकुरू (कर्नाटक) –  ३० मार्च या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त तुमकुरू जिल्ह्यातील मधुगिरी तालुक्यातील लिंगेनहळ्ळी गावात एका मंदिरात भक्तीगीते लावण्यात आली होती. त्यामुळे रागावलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरातील भक्तीगीतांचा आवाज अल्प करण्याची केली मागणी केली. त्यानंतर आणखी काही मुसलमान तरुण मंदिराच्या जवळ येऊन विरोध करू लागले. (हिंदूंच्या मंदिरातील आवाज अल्प करण्याची मागणी करणार्‍या मुसलमान तरुणांनी अजानचा आवाज अल्प करण्याची मागणी कधी केली आहे का ? या अजानच्या आवाजाचा त्रास हिंदू मुकाटपणे सहस करतात, याची जाण या मुसलमानांना असल्याचे दिसत नाही ! ती करून देण्यासाठी हिंदूसंघटन आवश्यक आहे ! – संपादक)