सातारा येथील रस्ते जर्मन तंत्रज्ञानयुक्त करणार ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री

लोकार्पण सोहळा

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे चालू आहेत. भविष्यात सर्व रस्ते जर्मन तंत्रज्ञानयुक्त करून सातारा येथील रस्ते राज्याला दिशादर्शक ठरतील, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील रहाणार आहोत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. शहरातील जुना आर्.टी.ओ. चौक ते सुभाषचंद्र बोस चौक रस्ता लोकार्पण सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला जर्मन तंत्रज्ञानयुक्त रस्ता सातारा येथे करावा, अशी माझी संकल्पना होती. त्यानुसार हा रस्ता साकारण्यात आला आहे. आता इलेक्ट्रिक, दूरभाष, गॅसपाईप किंवा इतर पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी रस्ता खोदावा लागणार नाही. या रस्त्यावरील पथदिव्यांवर ध्वनीक्षेपक बसवण्यात आले आहेत. पहाटेच्या वेळी चालायला जाणार्‍या सातारावासियांना भक्तीसंगीत ऐकण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे.