मुसलमानांच्या अंत्यविधीसाठी मुंबई महापालिकेकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेचे साहाय्य घेण्याचा निर्णय !

मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या मुसलमान व्यक्तींच्या अंत्यविधीमध्ये अडचण आल्यास ‘पीएफआय’ या आतंकवादी संघटनेचे साहाय्य घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये २० जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे झालेल्या भूस्खलनात कछार जिल्ह्यात ७, हैलाकांडी जिल्ह्यात ७, तर करीमगंज जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले आहेत.

तमिळनाडूत केशकर्तनालयात केस कापण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक

तमिळनाडू सरकारच्या नव्या नियमांनुसार केशकर्तनालयांना ग्राहकांची नावे, पत्ते, दूरभाष क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे केस कापण्यासाठी ग्राहकाला आधारकार्ड दाखवावे लागणार आहे.

गुजरातमध्ये आयुर्वेदीय उपचारांनंतर दीड सहस्रांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त !

गुजरात राज्य सरकारकडून कोरोनाग्रस्त रुग्णांवर आयुर्वेदानुसार उपचार केले जात आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून येत असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. 

निर्माती एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्या विरोधात देशद्रोह केल्याप्रकरणी मुंबईत तक्रार प्रविष्ट

‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेला आणि ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणून ओळखला जाणारा विकास पाठक याने नुकतीच खार पोलीस ठाण्यात निर्माती एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर यांच्या विरोधात देशद्रोह केल्याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास समजण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करा ! – इतिहासप्रेमींची मागणी

‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.

दळणवळण बंदीमुळे देशात १२ कोटी २० लाख लोक बेरोजगार झाले

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन ईकॉनॉमी’च्या (‘सी.एम्.आय.ई.’च्या) अहवालानुसार ३१ मे या दिवशी देशातील बेरोजगारीचा दर २३.४८ टक्क्यांवर पोचला.

काश्मीरमधील जिहादी आतंकवादासाठी पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीतून गोळा केले जात आहेत पैसे !

जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने आता धडक कारवाई करणे आवश्यक !

‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन हाच देहलीतील दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका

देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट

प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे महिला पोलीस शिपायावर प्रेम करणार्‍या तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले !

भुजनी गावात एका महिला पोलीस शिपायावर प्रेम करणार्‍या अंबिका पटेल या तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळून ठार मारण्यात आल्याची घटना घडली.