सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने ३ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन !

४ एप्रिलला श्रीराममूर्तीचे पूजन, तर ६ एप्रिलला ऐतिहासिक लवाजम्यासह भव्य शोभायात्रा !

पत्रकार परिषदेसाठी उपस्थित मान्यवर !

कोल्हापूर, २ एप्रिल (वार्ता.) – सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे उत्सवाचे हे ५ वे वर्ष असून हे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) या ठिकाणी ३ ते ६ एप्रिल या कालावधीत होतील. ४ एप्रिलला सकाळी १० वाजता श्रीराम मूर्तीपूजन, तर ६ एप्रिल या दिवशी सकाळी १०.१० वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, सकाळी ११ वाजता प्रसाद वाटप, तर दुपारी ४ वाजता अतीभव्य ऐतिहासिक शोभायात्रा निघेल. यात मर्दानी खेळ, श्री हनुमान देखावा, पारंपरिक वाद्ये, उंट, घोडे यांचा समावेश असेल. या प्रसंगी १ सहस्र १०० हनुमान चालिसा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने १ एप्रिल या दिवशी राधाकृष्ण मंदिर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या कार्यक्रमांमध्ये ३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता मिरजकर तिकटी येथील अंधशाळेला दैनंदिन साहित्य वाटप, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या समवेत सामूहिक भोजन होईल. ४ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता ‘शिव शंभू आणि स्वधर्म’ या विषयावर आंतरराष्ट्रीय लेखक आणि व्याख्याते श्री. ऋत्विक कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजता ३५० व्या ‘शिवराज्याभिषेक गीता’चे रचनाकार युवाशाहीर चंद्रकांत माने यांचा शाहिरी कार्यक्रम, तसेच भव्यदिव्य शिवराज्याभिषेक देखावा होईल. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाने केले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, श्री. अनिल चोरगे, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. विकास जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, श्री. विशाल पाटील, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीला माने, रेखा दुधाने, रश्मी साळोखे उपस्थित होत्या.

श्रीरामनवमी उत्सव समितीतील पदाधिकारी – अध्यक्ष श्री. विशाल पाटील, उपाध्यक्ष श्री. पियुष वाडकर, कार्याध्यक्ष श्री. सचिन भोळे, सचिव श्री. सुनील पाटील, उपसचिव – श्री. गणेश लाड, खचिनदार – श्री. अनिल चोरगे, सहखजिनदार- श्री. अमोल पाटील