मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ! – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांचा आरोप

शहरातील अनेक विकासकामे, गटारे, प्रवेशद्वार बांधणी यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

जतमध्ये (जिल्हा सांगली) सराफाचे सव्वा दोन कोटी रुपयांचे सोने लुटले

यातून चोरांना पोलिसांचा धाक नाही, असेच यातून दिसते. ही स्थिती दूर करण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देणे आणि शिक्षेची कार्यवाही त्वरित करण्याची आवश्यकता आहे.

चिनी मांजा आणि दोरा यांवरील बंदीची कडक कार्यवाही करावी ! 

अलीकडील काही वर्षांत चिनी मांजा आणि चिनी दोरा यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

शासनाच्या सर्व विभागांत मराठीचा वापर व्हावा ! – सुभाष देसाई

मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची आवश्यकता असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण !

महापालिकेच्या पहाणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आढळून आली नाही तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल,

अयोध्या येथील राममंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल ! – मिलिंद परांडे

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य आता गतिमान झाले आहे. अयोध्येतील राममंदिर संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्‍वास विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. 

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करणार्‍या महिलेची माघार

राष्ट्रवादीचे नेते आणि  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्‍या महिलेने आपण माघार घेत असल्याचे टि्वट केले आहे. या महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे की, तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते आहे. एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या.

३१ जानेवारी पूर्वी लाभार्थी शिधापत्रिकेवरील सर्व व्यक्तींचे आधार सिडींग करण्यात येणार ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.

चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !

भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वार कुंभमेळ्यासाठीच्या आरोग्याविषयीच्या सिद्धतेविषयीचा अहवाल मागितला !  

असा अहवाल न्यायालयाला मागवावा लागतो, याचा अर्थ सरकार आणि प्रशासन निष्क्रीय आहेत, असाच होतो !