मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ! – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांचा आरोप

ठाणे – मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.


शहरातील अनेक विकासकामे, गटारे, प्रवेशद्वार बांधणी यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कारकिर्दीत वर्ष २०१४ पासून अनेक घोटाळे उघड केले; मात्र एकही उत्तर द्यायला प्रशासन सिद्ध नाही. हे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्य शासनाकडे दाद मागू अन्यथा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू असे, प्रमोद सामंत यांनी या वेळी सांगितले.