आमरण उपोषण करणार्‍या खाण कामगारांपैकी दोघांची प्रकृती ढासळली : जिल्हा रुग्णालयात भरती

मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे.

१ फेब्रुवारीपासून वीजदेयक थकबाकीदारांची वीजजोडणी तोडणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

थकबाकीदारांमधील अल्प थकबाकीदारांनी वीज खात्याच्या ‘वन टाईम् सेटलमेंट’ योजनेचा लाभ घेतला आहे. नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर सर्व थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्र्यांनी दिली आहे.

दिव्यांगांनाही (विकलांगांनाही) आनंद देण्यासाठी ‘हेल्पडेस्क’

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद दिव्यांग (विकलांग) व्यक्तींनाही घेता यावा यासाठी ‘आंचिम’मध्ये दिव्यांगांसाठी खास ‘हेल्पडेस्क’ कार्यरत असेल, तसेच यंदा ‘एक्सेसिबल इंडिया-एक्सेसिबल चित्रपट’ या विभागात ३ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

इंडोनेशियातील भूकंपात ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ

इंडोनेशियामध्ये झालेल्या ६.२ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ३४ जणांचा मृत्यू, तर ७०० जण घायाळ झाले आहेत. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पाकने विमानाचे भाडे न दिल्याने मलेशियाकडून पाकच्या सरकारी विमान आस्थापनाचे विमान जप्त

इस्लामी देश म्हणून पाकला साहाय्य करणार्‍या मलेशियानेही पाकला वार्‍यावर सोडले आहे, हे पहाता आतातरी पाकला आतंकवाद आणि विकास यांतील भेद लक्षात येईल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे भविष्यात त्याचा विनाश अटळ आहे !

राज्यातील शाळा बंद असतांना शाळांसाठी स्वयंपाकघर साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटींची निविदा प्रक्रिया

निधीची चणचण असतांना आणि शाळा बंद असतांना ताटवाटयांची खरेदी कशासाठी ?

वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत यांनI आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे

धनंजय मुंडेंच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार प्रविष्ट

मुंडे प्रकरणात शरद पवार यांची भेट घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याची हकालपट्टी करा ! – भातखळकर

पाठीमागून सूत्र हालवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी.

भुयारी रस्त्याचे होणार आता शासकीय उद्घाटन !

अनुमाने ७५ कोटी रुपये व्यय करून भुयारी रस्ता बांधण्यात आला आहे.