जतमध्ये (जिल्हा सांगली) सराफाचे सव्वा दोन कोटी रुपयांचे सोने लुटले

जत (जिल्हा सांगली) – शेगाव येथे सोन्याचे दागिने देण्यासाठी जात असतांना सराफ बाळासाहेब वसंत सावंत यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ४ किलो ६०० ग्रॅम सोने (अंदाजे सव्वा दोन कोटी रुपयांचे) अज्ञात चोरांनी लुटून नेले. (यातून चोरांना पोलिसांचा धाक नाही, असेच यातून दिसते. ही स्थिती दूर करण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देणे आणि शिक्षेची कार्यवाही त्वरित करण्याची आवश्यकता आहे. – संपादक) १४ जानेवारी या दिवशी जतपासून ५ किलोमीटर अंतरावर रात्री १ वाजता हा प्रकार घडला. सावंत यांनी याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तात्काळ अन्वेषण चालू केले आहे.