धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करणार्‍या महिलेची माघार

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्‍या महिलेने आपण माघार घेत असल्याचे टि्वट केले आहे. या महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे की, तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते आहे. एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसतांना जे मला ओळखतदेखील नाहीत, ते चुकीचे आरोप करत असतील, तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते. जर मी चुकीची आहे, तर आरोप करणारे हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत ? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचे नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावे लागले आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होते, याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचे आहे ते लिहा.’