सांगली, १० ऑक्टोबर (वार्ता.) – भारतमातेशी एकरूप होण्यासाठीचे शक्तीस्थान म्हणजे श्री दुर्गामाता होय. भारतमातेचा संसार चालवण्यासाठीच नवरात्रोत्सवात श्री दुर्गामाता दौड करत आहोत. रामायणातील प्रत्येक प्रसंग हा आपणासाठी बोध देणारा आहे.
हिंदूंनी रामायणाचा अभ्यास करून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्याकडून जीवनाचे सार शिकणे आवश्यक आहे. भक्ती आणि शक्ती यांचा संगम असणारा वेदतुल्य ग्रंथ म्हणजे ‘रामायण’ होय. हिंदूंचे अधःपतन रोखण्यास रामायणातील सर्वच प्रसंग हे मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहेत.