नागरिकांना संकटाची जाणीव करून देणे आवश्यक असल्यामुळे रात्रीची संचारबंदी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे काही जणांकडून टीका केली जात आहे; मात्र जनतेला बंधन आणि संकट यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर सहस्रो मासे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बांधून ठेवले

इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

नगर अर्बन बँकेमध्ये ३ कोटी रुपयांचाअपहार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजप वरिष्ठ नेते आणि माजी खासदार दिलीप मनसुखलाल गांधी, घनश्याम बल्लाळ, आशुतोष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आरोप

कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापिठातील कामात घोटाळा केल्याचा आणि चारचाकी वाहनांच्या ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी सहस्रो रुपये मोजले असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

पोलीस कर्मचार्‍यांच्याच मुली सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ?

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकर्‍यांच्या नावाने सहस्रो कोटी रुपयांचे कर्ज काढून शेतकर्‍यांची केली फसवणूक !

आमदार रत्नाकर गुट्टे हे भ्रष्टाचारी असल्याचे ठाऊक असूनही जनता त्यांना निवडून देते आणि नंतर ५ वर्षे ‘ते काहीही काम करत नाहीत’

ठाणे येथे भाजपच्या वतीने सामूहिक भगवद्गीता पठण कार्यक्रम आणि ‘वन्दे मातरम्’ गायन स्पर्धा यांचे आयोजन

भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.

पारनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध करण्याचा ग्रामपंचायतींचा निर्णय

ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध लढवल्यास त्यात होणारे कोट्यवधी रुपये वाचून ते गावांच्या विकासकामांसाठी वापरता येतील.

श्रीलंकेमध्ये महिला अधिवक्त्याकडून फेसबूकवर श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र पोस्ट करून अवमान

केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !