श्रीलंकेमध्ये महिला अधिवक्त्याकडून फेसबूकवर श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र पोस्ट करून अवमान

श्रीलंकेतील हिंदूंकडून विरोध करत कारवाई करण्याची मागणी

केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

कोलंबो (श्रीलंका) – येथील अधिवक्त्या जीवनी करियावसम यांनी श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र फेसबूकवर पोस्ट केल्याच्या कृत्याला येथील हिंदु संघटनांनी विरोध केला आहे. जीवनी यांच्यावर कारवाई करण्याची मगणी या संघटनांनी केली आहे. तसेच काही संघटनांनी सायबर कायद्यान्वये तिच्यावर खटला चालवण्याची मागणी केली आहे.

මගේ සමාජ දේශපාලන අරගලය ගැන දිගු කලක සිට දන්නා දෙමළ සහෝදරයන් හා සහෝදරියන් පිරිසක් විටින් විට කතා කොට කරන ලද පැහැදිලි…

Posted by Jeevanee Kariyawasam on Tuesday, December 22, 2020

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

१. रशियाची वृत्तसंस्था ‘स्फुटनिक’शी बोलतांना हिंदु संघटना शिव सेनाईचे नेते एम्.के. सचितानाथन् यांनी सांगितले की, या पोस्टमुळे केवळ हिंदूच नाही, तर शांततेत रहाणार्‍या समाजालाही दुखावले आहे. आम्हाला संपूर्ण जगातील श्रीलंका वंशाच्या तमिळींकडून याविषयी पत्र मिळत आहेत. त्यांनी श्रीलंकेच्या दूतावासालाही जीवनी यांच्यावर आणि फेसबूकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर जीवनी यांना अटक करण्यात आली नाही, तर आमचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

हिंदु पुजार्‍यांच्या एका संघटनेने जीवनी यांच्या विरोधात लिहिलेले पत्र (चित्रावर क्लिक करा)

२. हिंदु पुजार्‍यांच्या एका संघटनेने जीवनी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची मोहीम चालवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांना पत्र लिहिले आहे.

३. श्रीलंकेतील खासदार एम्. गणेशन् यांनीही यास विरोध करत जीवनी यांना अटक करण्याची मागणी केली आहे.