श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि अन्य कामे यांसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्ययासाठी राज्यशासनाची मान्यता !

यात मनकर्णिका कुंड कामासाठी ५ कोटी ४० लाख ९९ सहस्र ९३४ रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ८५ लाख ९२ सहस्र ८७ रुपये, तर नगारखाना इमारत दुरुस्तीसाठी ३ कोटी ४१ लाख ३४ सहस्र ७७३ रुपये व्यय केले जाणार आहेत.

पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३ आगीच्या घटना !

सुसगाव येथील ‘बेलाकासा’ इमारत येथे असलेल्या कामगारांच्या वसाहतीमध्ये ३ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झोपड्यांना आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून संसारापयोगी साहित्य जळून खाक झाले.

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘ज्या सरकारचे सनातन धर्माशी नाते आहे, त्या सरकारशी मी जोडले गेले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पिंपरी (पुणे) महापालिकेचे कामकाज होईल ‘पेपरलेस’ !

३५ विभागांचेही कामकाज लवकरच ‘ऑनलाईन’ करण्यात येईल. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचे श्रम वाचून कामकाजामध्ये पारदर्शता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

राज्यातील शेतकर्यांच्या १ लाख ६० सहस्र रुपयांपर्यंतच्या कर्जाचे मुद्रांक शुल्क माफ होणार !

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहाणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकर्‍यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाचे १७ निर्णय घोषित !

निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण; हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करून रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.

अनुमतीपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘मेट्रो इको पार्क’मध्ये अवैधरीत्या वृक्षतोड केली असल्याचा आरोप !

निवडणूक आयोगाचे गोदाम बांधण्यासाठी रावेत येथील ‘मेट्रो इको पार्क’मधील वृक्षतोड करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे केली आहे.

आता तिकीट मिळण्याची वाट पहाणार नाही !

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी, तर महाराष्ट्रातील पहिली सूची घोषित केली; मात्र घोषित झालेल्या २० उमेदवारांच्या सूचीत सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ….

गुहागर येथे १८ ते २२ मार्चला पर्यटन महोत्सव !

मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत साडी नेसवली जाते.