हिंगोली येथील कोरोना संशयित आधुनिक वैद्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’
हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना संशयित एका आधुनिक वैद्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे.
हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना संशयित एका आधुनिक वैद्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे.
प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित ! पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.
जिवाचे रान करून सेवा बजावणार्या उचगाव फाटा, उचगाव ‘हायवे ब्रीज’, तावडे हॉटेल चौक परिसरातील कामावर असणार्या पोलिसांना, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चहापान देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने विविध क्षेत्रांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतीसाठी घोषित केलेले अर्थसाहाय्य पुरेसे नाही.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगलीहून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी रत्नागिरीत आले; मात्र रत्नागिरीकरांनी त्यांना भाजी विक्री करण्यापासून रोखले. ‘सांगली जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथून येणार्या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव
जिल्हा प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संघटनांचे संघटन असणार्या ‘हेल्पिंग हँड्स’च्या संयुक्त विद्यमानेे रत्नागिरी शहरातील नागरिकांना किराणा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अनुमाने १६० दुकानदारांचे साहाय्य घेतले गेले आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यासमवेत राज्यातून इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि पालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे; मात्र झोपडपट्टी अन् वसाहती यांच्या परिसरात अनेक खासगी चिकित्सालयेे जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांची असुविधा केली जात आहे. अशा दायित्वशून्य डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी घोषित केलेली असतांना पोलीस आणि प्रशासन यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणार्यांची संख्या वाढली आहे.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर न्यासाच्या वतीने रक्तसंकलन अभियान राबवण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर याविषयी म्हणाले की, मुंबईत रहाणार्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी स्वत:चे नाव श्री सिद्धीविनायक मंदिरात सकाळी १० ते…