‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ या वृत्तसंकेतस्थळाच्या वतीनेही ३१ डिसेंबरच्या रात्री रक्तदानाचा उपक्रम

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे अनेक अपप्रकार घडतात. ते रोखण्यासाठी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या वतीने ‘झिंगू नका, पिऊ नका, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदानाची संधी सोडू नका’, असे आवाहन करण्यात आले. सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी हेही यात सहयोग देणार आहेत.

पोलीस-प्रशासनही सतर्क

ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अवैध मद्य आणि अमली पदार्थ यांची वाहतूक होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस दल सतर्क झाले असून विविध तपासणी नाक्यावर कसून तपासणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील सटमटवाडी, बांदा येथील पोलीस तपासणी नाक्याला अचानक भेट देऊन पहाणी केली.