मुंबई – देशातील प्रमुख टेलिकॉम आस्थापन असलेल्या रिलायन्सने १ जानेवारीपासून ‘जिओ’च्या भ्रमणभाषवरून अन्य सर्व संपर्क विनामूल्य करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ‘जिओ’व्यतिरिक्त अन्य क्रमांकांवर संपर्क केल्यावर आकारण्यात येणारे शुल्क ‘जिओ’ने पूर्णपणे रहित केले आहे.
#Reliance Jio New Year Recharge Plans; IUC charges, Free Voice Calls From Jan 1
— OTV (@otvnews) December 31, 2020
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया’कडून) भारतात १ जानेवारी २०२१ पासून ‘बिल अॅन्ड कीप’ हा नियम लागू करण्यात येत आहे. यामुळे कोणत्याही दूरभाष संपर्कावरून अन्य आस्थापनाच्या क्रमांकावर संपर्क केल्यावर आकारण्यात येणारे शुल्क रहित केले जाणार आहे. त्यामुळे ‘जिओ’ने त्यांच्या ग्राहकांवरील हे शुल्क रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ‘जिओ’कडून जिओव्यतिरिक्त अन्य संपर्कासाठी प्रति मिनिटाला ७ पैसे आकारण्यात येत होते. हे शुल्क आता आकारण्यात येणार नाही.