रेखा जरे हत्याकांडातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

नगर – ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी ३० डिसेंबर या दिवशी सायंकाळी नगरमध्ये ‘कँडल मार्च’ काढण्यात आला. अनेक सामाजिक संस्था या ‘मार्च’मध्ये सहभागी झाल्या होत्या. जरे यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सहभागी झालेल्या संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. जरे यांना न्याय मिळेपर्यंत आपण आपला लढा चालूच ठेवू; मात्र या संदर्भात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.
रुणाल जरे म्हणाले, ‘‘मी मुलगा म्हणून नाही, तर सामान्य नागरिक म्हणून सर्वांचे आभार मानतो. आईची हत्या कशामुळे झाली ?, का झाली ?, याचा पोलीस तपास करतीलच; पण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह त्यांच्या पोलिसांनी चांगल्याप्रकारे तपास केला आहे.’’