‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणे अकरापर्यंतच साजरे करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतातही नवीन वर्ष गुढीपाडव्याऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे !

पुणे – ब्रिटनमध्ये वाढलेल्या कोरोनामुळे पुण्यात यापूर्वीच रात्री अकरानंतर संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या वर्षी नवीन वर्षाच्या स्वागतावर मर्यादा घालण्यात आल्या असून संचारबंदी लागू असल्याने ‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणे अकरापर्यंतच साजरे करता येणार आहे. ३१ डिसेंबरला हॉटेल आणि ‘होम डिलिव्हरी’ सुविधाही पावणे अकरा वाजताच बंद होईल, असे आदेश पुणे महापालिकेने काढले आहेत.

फटाक्यांची आतषबाजी करू नये, ६० वर्षांवरील नागरिक आणि १० वर्षांखालील मुले यांनी घराबाहेर जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे अशा काही सूचनांसह १ जानेवारीच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच ‘सेलिब्रेशन’ करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.