अमरावती येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

नगरसेविकेकडून सनातनच्या कार्याचे कौतुक 

भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे, हा तिच्या शालीनतेला धक्का ! – विशेष पोक्सो न्यायालय

भारतीय राज्यघटना आणि कायदे यानुसार भारतीय न्यायालय चालते. पाश्चात्यनिर्मित गूगलवरील जागतिक संदर्भातील अर्थ भारतीय समाजजीवन, मानसिकता, रित, संस्कृती यांना लावून कसे चालतील ? एवढेही आरोपीच्या अधिवक्त्यांना समजत नाही का ?

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी पेरारीवालन यांच्या याचिकेवर न्यायालयाने अभिनेता संजय दत्त यांच्या सुटकेचा तपशील मागितला 

अनधिकृत शस्त्रास्त्रेप्रकरणी शिक्षा होऊनही अभिनेता संजय दत्त यांची शिक्षा १ वर्षाने न्यून का करण्यात आली ? राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारीवलन यांची याचिका !

पृथ्वीवरील कार्बन अल्प करण्यासाठी बांबूची लागवड करा ! – पाशा पटेल, माजी अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक तथा कृषीमूल्य आयोग

‘पृथ्वीवर आता मानवजात जिवंत रहाणार नाही’; कारण पृथ्वीवरचे तापमान आणि कार्बन हे दोन्ही वाढत आहे. वर्ष २०२४ मध्ये पृथ्वीचे तापमान वाढणार आहे आणि ज्या दिवशी ते अडीच अंशाने वाढेल, त्या दिवशी पृथ्वीवर माणूस जगणार नाही, अशी भीतीही या कराराच्या वेळी व्यक्त करण्यात आली होती.

मेंढ्यांना क्रौर्यतेने वागणूक देणार्‍या २ धर्मांधांवर कराड (जिल्हा सातारा) येथे गुन्हा नोंद !

ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करून त्यांचे हाल करणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा दिल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असेच जनतेला वाटते.

कार्यालयीन कामाचे वेगवेगळ्या वेळांचे नियोजन आखण्यासाठी केंद्रशासनाने राष्ट्रीय धोरण आखावे !

कार्यालयीन कामाची सकाळी १० ते सायंकाळी ५ या पारंपरिक वेळेची मानसिकता पालटून वेगवेगळ्या वेळांचे नियोजन करणे आवश्यक आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या वीजवितरण आस्थापनाला सूचना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या व्यापारीवर्गाने वीजदेयके भरण्याविषयी दिलेल्या प्रस्तावानुसार सर्वांना वीजदेयके हप्त्यांमध्ये भरण्याची सोय करून द्या, असे निर्देश सिंधुदुर्ग दौर्‍यावर असलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र वीजवितरण आस्थापनाला दिले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांत कठोर निर्बंध !

कोरोनाचे प्रमाण पुष्कळ वाढल्याने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमरावती शहरात १२ प्रतिबंधित क्षेत्रे, तर नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांतही ‘दळणवळण बंदी’च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जात आहे.

पुणे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी दिले.

‘लॉकडाऊन’ नको असेल, तर कोरोनाचे नियम पाळा ! – मुख्यमंत्री

‘वर्क फ्रॉम होम’ करा. येत्या काळात परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून २१ फेब्रुवारी या दिवशी साधलेल्या संवादात सांगितले.