अमरावती येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

नगरसेविकेकडून सनातनच्या कार्याचे कौतुक 

नगरसेविका सौ. सुमती ढोके

अमरावती, २१ फेब्रुवारी – अमरावतीकर प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेने नुकत्याच आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधकांनी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते. साधक कार्यक्रमातही सहभागी झाले. या वेळी अमरावतीकर प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. गजानन गोमासे यांनी ‘आमच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावले जाईल’, असे आम्ही निमंत्रण पत्रिकेमध्येही छापू’, असे आश्‍वासन दिले. तसेच स्थानिक नगरसेविका सुमती सौ. ढोके यांनी सनातन संस्था करत असलेल्या कार्याचे याप्रसंगी कौतुक केले.