मेंढ्यांना क्रौर्यतेने वागणूक देणार्‍या २ धर्मांधांवर कराड (जिल्हा सातारा) येथे गुन्हा नोंद !

ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करून त्यांचे हाल करणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा दिल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असेच जनतेला वाटते.

सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – ट्रकमध्ये दोन कप्पे करून ४० जनावरांच्या वाहतुकीची अनुमती असतांना २३९ मेंढ्यांची वाहतूक करणारा ट्रक ‘ध्यान फाऊंडेशन’च्या प्राणीमित्रांनी कराड येथे पकडला. गुजरातहून बेंगळुरूकडे मेंढ्या घेऊन जात असतांना ही कारवाई करण्यात आली आहे. कराड शहर पोलिसांनी ट्रक कह्यात घेऊन २ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. अब्दुल हमीद महम्मद हुसेन शेख (रा. जमालपूर, गुजरात) आणि अन्वर बाबुखान अन्सारी (रा. रोनक बझार, अहमदाबाद), अशी संशयितांची नावे आहेत.

सौजन्य : Time Live News मराठी

‘ध्यान फाऊंडेशन’च्या प्राणीमित्रांनी कराड-मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रकवर पाळत ठेवून ट्रक थांबवला. ट्रकमध्ये पहाणी केली असता क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात चार्‍या-पाण्याची व्यवस्था न करता शेळ्या-मेंढ्यांना दाटीवाटीने कोंबले होते. त्यामुळे एका मेंढीचा गुदमरून ट्रकमध्येच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याविषयी माहिती मिळताच ‘ॲनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन’चे अमोल शिंदे कराड पोलीस ठाण्यात आले. त्यांनी शेळ्या आणि मेंढ्यांना कराड नगरपालिकेच्या कोंडवाड्यात नेऊन त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था केली.