रस्ते, पदपथ आदींवरील अवैध धार्मिक स्थळे हटवा !  

न्यायालयाने आदेश दिल्यावर अतिक्रमण हटवणारे प्रशासन नको, तर अतिक्रमण होऊच न देणारे प्रशासन हवे !

सौदी अरेबियाकडून चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी

सौदी अरेबियाने निकृष्ट आणि खोट्या सवलती देऊन कपडे, बॅग, अत्तर आदी साहित्य विकणार्‍या चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी घातली आहे.

जिल्हा न्यायालयाकडून केंद्र, राज्य आणि ६ पक्षकार यांना उत्तर देण्याचा आदेश

हिंदूंबहुल देशात हिंदूंना त्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी न्यायालयीन किंवा अन्य स्तरांवर प्रदीर्घ लढे द्यावे लागतात, हे लज्जस्पद ! हिंदूंना त्यांचे हक्क मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘फास्टेग’ अधिसूचनेतून गोव्याला वगळा अन्यथा न्यायालयात जाऊ ! – काँग्रेस

केंद्रशासनाने ‘फास्टेग’ अधिसूचनेतून गोवा राज्याला न वगळल्यास न्याय मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाला उच्च न्यायालयात जाणे भाग पडणार आहे, अशी चेतावणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.

पुणे येथील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय

शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

मगोपने प्रविष्ट केलेल्या २ पैकी एक याचिका मागे घेतली

आमदार अपात्रता प्रकरण पणजी – सध्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी मगोपशी बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला. या पार्श्‍वभूमीवर मगोपने गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे २ अपात्रता याचिका प्रविष्ट केलेल्या दोन्हीही याचिका त्याच मंत्र्यांच्या विरोधात आणि एकाच स्वरूपाच्या होण्याची शक्यता असल्याने यामधील एक याचिका मगोपने १० मार्च या दिवशी … Read more

विवाहितेचा सासरी झालेल्या छळाला पतीच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय

भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी रहायला जाते; परंतु सासरी एखाद्या महिलेला कुटुंबियांकडून मारहाण झाली, तर तिच्या दुखापतींसाठी मुख्यत: तिचा पतीच उत्तरदायी असेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख करणार्‍याच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित केला.

मनकर्णिका कुंड पूर्णत: खुले करण्यात ‘माऊली लॉज’च्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास ५ जुलै २०२० या दिवशी प्रारंभ झाला. कामाला प्रारंभ केल्यावर कुंडाच्या परिसरातील विद्युत् जनित्र, विद्युत् खांब, फुलांची दुकाने, दत्त मंदिराजवळील दुकाने हालवणे यांसह अनेक अडथळे आम्ही पार केले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील २ खासगी दावे न्यायालयाने फेटाळले

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी लष्कर न्यायालयात नोंद करण्यात आलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळले आहेत.