सौदी अरेबियाकडून चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाने निकृष्ट आणि खोट्या सवलती देऊन कपडे, बॅग, अत्तर आदी साहित्य विकणार्‍या चीनच्या १८४ संकेतस्थळांवर बंदी घातली आहे. तसेच सौदी सरकारने लोकांना विश्‍वसनीय दुकानांतून साहित्य खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

पाककडून चिनी अ‍ॅप ‘टिक टॉक’वर बंदी

पाकच्या पेशावर येथील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाकने चिनी अ‍ॅप ‘टिक टॉक’वर बंदी घातली आहे. या अ‍ॅपवरून अश्‍लील मजकूर प्रसारित केला जात आहे, असा दावा करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा आदेश दिला.