अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो !

फाशीची चिंता नाही ?

चोर-दरोडेखोरांना ठाऊक असते की, ‘फार काय करतील, २-४ वर्षे आत रहावे लागेल इतकेच !’ आणि आता तर बलात्कारी अन् खुनी यांनाही कळून चुकले आहे की, ‘फाशी वगैरे काही लगेच होत नसते !’ ज्याचा धाक असायला हवा, त्यातीलच हवा निघून गेली आहे ! सगळ्यांना मोकळे रान मिळाले आहे, असेच तर यातून दिसून येत नाही ना ?

गोपालगंज (बिहार) येथील विषारी दारूच्या प्रकरणी ९ जणांना फाशी, तर ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा

खजूरबानी येथे वर्ष २०१६ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू, तर ६ जण आंधळे झाल्याच्या प्रकरणी गोपालगंजमधील न्यायालयाने ९ आरोपींना फाशीची आणि ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने पीडितेला पेटवले !

हनुमानगड (राजस्थान) येथे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर त्याने पीडितेवर रॉकेल ओतून तिला पेटवले.

बेळगाव सीमाप्रश्‍नावर केवळ प्रतीवर्षी विधीमंडळात बोलणे, ही तेथील मराठी बांधवांची चेष्टा ! – आमदार जयंत पाटील, शेकाप

बेळगावमधील साडेतीन तालुक्यांचा मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. न्यायालयात आणखी किती दिवस भांडणार ? बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात आला पाहिजे. पूर्वी अधिवेशनाच्या प्रारंभी सीमाप्रश्‍नावर बोलले जात असे.

मुख्य आरोपी बाळ बोठे पसार घोषित

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे.

घटस्फोट घेणार्‍या दांपत्याला त्यांच्या मुलांचा पदवीधर होईपर्यंत सांभाळ करावा लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

घटस्फोट झालेल्या दांपत्याला त्यांचे मूल पदवीधर होईपर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला

भारत कोरोना लस अन्य देशांना दान देत आहे किंवा विकत आहे; मात्र देशातील नागरिक त्यापासून वंचित ! – देहली उच्च न्यायालय

सिरम आणि भारत बायोटेक यांना उत्पादन क्षमता सांगण्याचा आदेश

घरांच्या छतावर मोबाइल टॉवर्स लावता येणार नाहीत ! – पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा आदेश

निवासी क्षेत्रांमध्ये घरांच्या छतांवर भ्रमणभाष टॉवर उभारण्याची अनुमती दिली जाणार नाही.

उल्हासनगर येथे पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणार्‍या २ भावांना न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी आशिष आणि आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.